सासवड येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी युवक मेळाव्याला उपस्थित राहिले.

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सासवड येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी युवक मेळाव्याला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधला. या मेळाव्याला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. युवा शक्तीमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी आमदार संजय जगताप, जगन्नाथ बापू शेवाळे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संभाजीराव झेंडे, स्वप्निल गायकवाड, शिवराज मोरे, मयुर दाैंडकर, महेश तापरे, विशाल सातव, अविनाश बलकवडे, चेतन महाजन, पुष्कराज जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.