शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला. अशा शब्दात शिवसेने मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकार व त्यांच्या सूत्रधारांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. असा आरोप करत धाडसत्र व सूडाची छापेमारी ही भाजपची शस्त्रे असल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे.
