सोलापुर ऐवजी पंढरपुरला विमान तळ व्हावे; भाजपाचे नेते संतोष पाटील यांची मागणी

सोलापुर जिल्ह्यातील विमानतळ सोलापूर ऐवजी जगात आणि देशात प्रसिद्ध असणाऱ्या व दक्षीणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे करण्याची मागणी भाजपचे राज्याचे नेते संतोष पाटील यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. सोलापूर येथे विमानतळ करण्यासाठी विमान प्राधिकरणाने बोरामणी परिसरात जमिनी संपादित केल्या आहेत. या जमिनी संपादित करून जवळपास दहा वर्षे उलटून गेली आहेत. एवढा कालावधी उलटून गेला असताना सुद्धा संपादित ठिकाणी विमान तळाचे काहीही काम झालेले नाही. मुळात सोलापूरच्या विमानतळासाठी बोरामणी परिसरातील जी जागा आहे ती योग्य नाही. सोलापूरचे विमानतळ जिल्ह्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मद्यवर्ती ठिकाणी गरजेचे आहे. विमानतळा साठी बोरामणीची जागा सोलापूरच्या एका बाजूला आहे.;