राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिना उलटल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर केवळ १८ मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्याअगोदरच शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे या अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
;