काँग्रेसच्या नेत्यांनी आता हॅलो ऐवजी 'जय बळीराजा' म्हणा; नाना पटोलेंची सूचना

काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणाव अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्याकर्त्यांनी सूचना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारींसह कर्मचाऱ्यानी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यापासून राज्यात नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

वंदे मातरम् आमचा स्वाभिमान पण बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. वंदे मातरम् ला आमचा विरोध नाही. मात्र, जय बळीराजा म्हणणं यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. बळी राजा हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही जय बळीराजा म्हणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

;