सामनातून होणाऱ्या टीकेबद्दल विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी सामना वाचत नाही, मला त्याबाबत काही माहित नाही. सामनाचे वेगळे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्यापेक्षा लोकप्रतिनिधींचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात. सामनावरच्या टीकेप्रमाणेच त्यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारने आता अधिक ताकदीनं आणि जोमाने राज्यकारभार करायला पाहिजे, अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे. तसंच पायाभूत सुविधा आणि प्रोजेक्ट्सवर भर देऊन नव्या सरकारने डबल मेहनतीने काम करणं आवश्यक असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.;
