पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले आहे. या दरम्यान पीएम मोदी यांनी देशातील 5G सर्विसच्या सुरुवातीसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. पीएम मोदी यांनी म्हटले की, लवकरच ५जी सर्विसची उत्सूकता संपणार आहे. पीएम मोदी यांनी जनतेला संबोधित करताना म्हटले की, 5G, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि ग्रामीण क्षेत्रात ऑप्टिकल फायबर केबलने आम्ही डिजिटल इंडियाची मोहीम जमिनी स्तरावर आणत आहोत. मेड इन इंडिया टेक्नोलॉजी सोल्यूशन वर सुद्धा यावेळी पीएमने जोर दिला आहे. डिजिटल इंडिया प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल करणार आहे.;
