मी विचारलं देवेंद्रजी काय झालं? शिंदेंनी सांगितला ४५ दिवस जुना किस्सा..

फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला, तरी शपथविधीच्या वेळी त्यांचा पडलेला चेहरा अनेकांना विसरता आलेला नाही. पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानत फडणवीसांनी अल्प काळातच आपली नाराजी दूर सारली होती. मात्र खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नजरेतून फडणवीसांच्या वर्तनातील अवघडलेपण सुटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सांभाळण्यास कसे तयार झाले, हे खुद्द शिंदेंनी सांगितलं आहे.;