भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही दोन देशापुढची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, असं म्हटलं आहे. घराणेशाही संपवण्यासाठी आपल्याला साथ देण्याचं आवाहनही यावेळी मोदींनी केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपल्या नवव्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं की, भारतापुढील सर्वात मोठी दोन आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही आहेत. भ्रष्टाचार देशाला पोखरत आहे आणि घराणेशाही राजकारणातूनही संधी हिसकावून घेत आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच घराणेशाही संपवण्यासाठीच्या लढ्यात आपल्याला साथ देण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं आहे. तिरंगा फडकवल्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी स्वातंत्र्यदिनाचं भाषण सुरू केलं. तेव्हा पंतप्रधान म्हणाले: "भारतात काहीतरी खास आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमच्या विकासाच्या मार्गावर शंका घेणारे अनेक संशयी होते. या भूमीतील लोकांमध्ये काहीतरी वेगळे आहे हे माहित नव्हतं. ही माती खास आहे हे त्यांना माहित नव्हतं."
