महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतरही ‘एमआयएम’च्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रवेशाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुक्रवारी रात्री सोलापुरात आले आणि शनिवारी सकाळी सोलापुरातून सांगलीला गेले. तौफिक शेख थेट पक्षात आले, माजी आमदार दिलीप माने व माजी महापौर महेश कोठे यांनी जुळे सोलापुरातील ठेंगील वाड्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेत चर्चा केली. त्याच्या या डिनर डिप्लोमसीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.;
