चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानं हे पद रिक्त झालं होतं, त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा भाजपकडून लवकरच करण्यात येणार आहे.;