प्रतिमा डागाळलेल्या मंत्र्यांच्या समावेशावर अजित पवार म्हणाले, जनता पाहातेय..

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गटातील 9 आणि भाजपमधील 9 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेतलेल्या अनेक मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांवर आरोप आहेत. यावरून आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार उद्यापर्यंत खातेवाटप होण्याची शक्यत व्यक्त करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराचा मागणी करत होतो. आता शपथविधी केला. मात्र महाराष्ट्रातील जनता केवळ पाहात असते कोण काय करत. ज्यांची प्रतिमा डागाळेली आहे आणि ज्यांना क्लिनचीट मिळालेली नाही, त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळात घेतलं. हे चुकीचं आहे.


एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी मंत्रीमंडळात सहकारी घेत असताना ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते. तेच फडणवीस आता आरोप झालेल्या लोकांना मंत्रीमंडळात घेताना शांत बसतात. हे अत्यंत चुकीचं आहे. शिवाय मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान न देणे खटकणारी बाब असल्याचं पवार म्हणाले.

;