Narayan Rane
संक्षिप्त कारकीर्द
- इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
- इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
- इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
- इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
- इ.स. २००८ : प्रहार (वृत्तपत्र) सुरू केले.
- इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली.
- इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
नारायण राणे हे महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इ.स. २००५ साली शिवसेनेचा त्याग करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमधील नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे
Offices Held
- 1996–1999 Minister of Revenue, Dairy Development, Animal husbandry, Fisheries, Khar lands, Special assistance & rehabilitation.
- 1999 Chief Minister of Maharashtra State
- 2005–2008 Minister of Revenue
- 2009–2014 Minister of Industries, Revenue