मातंग समाजाचे मयत संजय ताकतोडे यांच्या परिवाराला न्याय

मयत संजय ताकतोडे यांनी पाच वर्षापुर्वी मातंग समाजाच शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जि. बीड, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी जल समाधी घेतली होती. त्यावेळचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी संजय ताकतोडे यांच्या परिवाराला शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले होते व त्याअनुषंगाने आपण सदर कुटूंबाला शासकीय नोकरी देण्याचे लेखी स्वरुपात पत्र क्र. २०१९/आरबी/डेस्क-१/कावि १९७ अन्वये आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत सदर परिवारात एकाही व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. हे पाहता मी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा. ना. डॉक्टर रामदास आठवले साहेब यांच्याकडे हनुमान ताकतोडे यांना घेऊन गेलो असता आठवले साहेबांक