पक्ष स्थापना मेळावा

सत्तेसाठी हपापलेल्या, विचारांना तिलांजली देणाऱ्या आणि जनतेने दिलेल्या मतांशी गद्दारी करणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांना बाजूला सारून, सुसंस्कृत व जनतेच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारं राजकारण घडविण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात आपलं पहिलं पाऊल टाकतोय… दोनच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या स्वराज्य संघटनेला जनतेच्या प्रेमाच्या जोरावर इतक्या कमी कालावधीतच पक्ष म्हणून मान्यता मिळाली. सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले. आपला पक्ष आणि निवडणूक चिन्ह घराघरापर्यंत पोहोचविणे हे आता सर्वांचेच कर्तव्य आहे. नवीन पक्ष आहे म्हणून थट्टा करणाऱ्यांना, टिंगल करणाऱ्यांना, घाबरवू पाहणाऱ्यांना अजिबात घाबरायचं नाही ! “पहिला ते तुमच्याक