Promise to listen to every Karjat-Jamkhedkar

कर्जत येथील कार्यालयात काल लोकांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. व्यक्तिगत पातळीवर असणाऱ्या समस्या, प्रश्न, प्रलंबित कामे मार्गी लागतील म्हणून मोठ्या विश्वासाने लोक भेटण्यासाठी येत होते. शक्य त्या प्रकारे सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द या भेटीत प्रत्येक व्यक्तीस देण्यात आला. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. मोठ्या विश्वासाने भेट घेतल्याबद्दल कर्जतकरांचे मी मनापासून धन्यवाद मानतो.