Basic Information :
Samarjeetsinh Ghatge
Samarjeetsinh Vikramsinh Ghatge
Wednesday, January 19, 1983
ghatgesamarjeet@gmail.com
90280226866
Kagal
Chairman of Shahu Group & Member of DPC Kolhapur
समरजीतसिंह विक्रमसिंह घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभा 2024 ची निवडणूक लढवत आहेत
स्व. विक्रमसिंहराजेंच्या अकाली निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक समरजितसिंह यांनी विक्रमी मतांनी जिकली. त्यांना मिळत असलेल्या बळकट जनाधाराचे हे द्योतक होते. यानंतरच्या कालावधीत राजे बँक व कृषी संघ या शाहू परिवारातील संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी बिनविरोध यश मिळविले. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाला प्राधान्य देणार्या उमेदवारांना पाठबळ देत विजय मिळवून दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. कागल तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकाही त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पार पडल्या. कागल - कोल्हापूर भागातील एक युवा व खंबीर नेतृत्व ही समरजितसिंह घाटगे यांची नवी ओळख घडते आहे.
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी आपले संपूर्ण जीवन कागलवासियांसाठी समर्पित केले. व्यवसायांची उभारणी करतानाही त्यांनी आपल्या सर्व संस्थांना राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिले. त्यांचे जनकार्य अविरतपणे सुरू राहावे या उद्देशाने समरजितसिंह घाटगे यांनी 'राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन'ची स्थापना केली. समरजितसिंह घाटगे हे या फाऊंडेशनचे अध्यक्षपद सांभाळत असून त्यांच्या पत्नी सौ. नवोदिता घाटगे फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा आहेत. समर्पित वृत्तीने काम करणार्या अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने राजमाता जिजाऊ संस्था व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या रूपाने महिला व युवक सक्षमीकरणाची धुरा तितक्याच तोलामोलाने पेलली जात आहे.
Please Add Description


