
Parth Ajit Pawar
Parth Pawar is current IGNR from Baramati [Maharashtra]. He belongs to Nationalist Congress Party [ NCP ].
मावळ लोकसभा मतदारसंघातला एक तरूण उमेदवार. मुंबईतील एच. आर. कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा मी पदवीधर आहे. तुमच्यासाठी मी जरी नवीन असलो तरी माझ्यासाठी तुम्ही आणि आपला महाराष्ट्र अजिबात नवीन नाही. कारण मी अशा घरात जन्मलो आहे, जे घर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबध्द आहे. राजकारणातून समाजकारण कसं साधावं, याचं बाळकडू मला याच घरात मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांच्या सहवासानं माझ्यावरही ते संस्कार आपोआपच घडत गेले आहेत. आदरणीय श्री. अजितदादा पवार यांचे विकासकार्य मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. माझी आई सौ. सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या कार्यातून मला समाजसेवेचे धडे दिले आहेत आणि उत्कृष्ट संसदपटू ओळखल्या जाणार्या सर्वांच्या हक्काच्या ताई आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे या माझ्या मार्गदर्शक आहेत. या सर्वांकडून मला महाराष्ट्र फार पूर्वीपासून समजला आहे आणि आता या महाराष्ट्राच्या विकासात आपणही योगदान द्यावं, याची जाण मला आलेली आहे.
आपला भारत हा तरूणाईचा देश आहे. या आजच्या तरूणांचे भावविश्व वेगळे आहेत. राजकारण्यांकडून त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्यांचे प्रश्नही वेगळे आहेत. हे सारं मी समजू शकतो कारण मीही त्यांच्यातलाच एक तरूण आहे. त्या दृष्टीकोनातून निवडणूक लढविण्याची मला मिळालेली ही संधी माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या विकासाचा वारसा आणि दुसरीकडे भविष्याचा वेध घेणारं युवा मन, असा दुर्मिळ व दुहेरी संगम माझ्याबाबतीत घडलेला आहे, हे मी माझं भाग्य समजतो. आज, ज्या मावळ मतदारसंघातून मी, ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे; तो मावळ माझा स्वतःचा आवडता परिसर आहे. या भागाला निसर्गानं खूप काही दिलंय. या मावळ मतदारसंघात समुद्रकिनारे आहेत, नद्या आहेत, धरणं आहेत, निसर्ग आहे. पण तरीही हा मावळ आजपर्यंत उपेक्षित राहिलाय, ही खंत माझ्या मनात खूप दिवसांपासून होती आणि आज मला ती संधी मिळालेली आहे की माझा मावळ अतिशय सुंदर रीतीने मी जगासमोर आणू शकतो. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मावळचा विकास होणं अत्यंत गरजेचे आहे. आज मावळात इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला हवं. एज्युकेशनल हब व्हायला हवं. या सार्याची क्षमता माझ्या मावळात आहे, हे मला स्पष्ट दिसतंय आणि म्हणून हे सारं साकारण्यासाठी मी अधिक प्रयत्न करणार आहे. पण त्यापूर्वी जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न मला अधिक महत्त्वाचे वाटतात. आज इथल्या शेतकर्यांना हमीभाव मिळत नाही तर, त्यांच्या तरूण मुलांना रोजगारही नाही. हाताला काम आणि खायला अन्न नसताना नुसती विकासाची स्वप्नं दाखवणं, भूलथापा मारणं मला मान्य नाही. आज या मावळात अनधिकृत बांधकामे, रेड झोन, रस्ते, महिलांची सुरक्षा आणि त्यांचे आर्थिक स्वावलंबन, शैक्षणिक सुविधा असे अनेक प्रश्न गेल्या ५ वर्षांत अधिक वाढले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी आज या निवडणुकीत उभा आहे.
पण मी जादूगार नाही. खोटी आश्वासने मी देणार नाही. जे घडू शकतं तेच मी सांगतो. मला तर्कशुध्द बोलायला आवडते. आपलं काम प्रामाणिकपणे आणि चोख करावं ही माझी नीती आहे.
माझ्याबद्दल जे काही सांगण्यासारखं आहे, ते आज तुमच्यासमोर मांडत आहे. या निवडणूकीत अनमोल मताच्या रूपानं ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवकांची साथ मला मिळावी, हीच माझी नम्र विनंती!
Sr. No. | Contact Number | Tahsil | |
---|---|---|---|
1 | Sunil Ramchandra Bhondave | 9764875484 | Umarga |
2 | Siddharth Vilas Kam le | 7720024741 | Baramati |