Stree foundation had organised a felicitation program

विजयानंतर अनेकांनी वेगवेगळे समारंभ आयोजित करुन त्यात प्रेमाने माझा सत्कार केला. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी सत्काराला उपस्थित राहण्याचा, सत्कार स्वीकारण्याचा आग्रह होतो. लोकांच्या या प्रामाणिक भावना मला कधीच मोडता येत नाही. ज्याप्रमाणे माझा नागरी सत्कार करण्यासाठी कर्जतचे नागरिक एकवटले त्याच प्रमाणे आत्ता कर्जतच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येवून उद्याचे नवे विकसित शहर साकार करूया. आपण दाखवत असणाऱ्या या प्रेमाबद्दल मी आजन्म आपला ऋणी राहील.