कर्जत तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनच्या प्रश्नांबाबत

कर्जत तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनच्या प्रश्नांबाबत काल प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. नितीन काकोडकर यांची भेट घेवून कर्जत तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोनच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पर्यावरणाचा विकास हा महत्वाचा विषय आहेच. वृक्षतोड होवू न देता विकासकामे करायला हवीत. कर्जत तालुक्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये १० किलोमीटरमध्ये विकासकामे करण्यास निर्बंध आखण्यात आले आहेत. अशा निर्बंधामुळे रस्तांसारखे मुलभूत प्रश्न तर उद्योगनिर्मितीचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यास अडचण ठरत असल्याची लोकांची मागणी आहे. अनेक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करण्यात आली आहे.