वेल्हे (राजगड)

५ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या निवडणुक प्रचार दौऱ्याच्या नियोजनासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक वेल्हे (राजगड) येथे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते व उमदेवार यांचा प्रचार दौरा कसा असावा या संदर्भात नियोजनात्मक चर्चा करुन आराखडा तयार करण्यात आला.