मान्सून पूर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महावितरणाला सूचना!

मान्सून पूर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महावितरणाला सूचना! महावितरणचे अधीक्षक शहर अभियंता यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. ऐन पावसाळ्यात नागरिकांना वीजेच्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. पूर्व मतदार संघातील सिडको, गारखेडा आणि कैलासनगर मंडळातील विविध रखडलेल्या आणि मान्सून पूर्व कामांचा आढावा घेत कामे मार्गी लावून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. सिडको मधील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी चिकलठाणा बरोबर ३३kv हर्सूलशी जोडणी करून सपोर्ट देण्यात यावा, ३३kv मध्ये ४ ठिकाणी आयसोलेटर स्विच टाकण्यात यावा, लघुदाब वाहिनीच्या केबल या अतिशय जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यात याव्यात, सिडको परिसरातील प्रमुख ट्रांसफार्मर बदलून २००kv क्षमतेचा करण्यात यावा, याबाबत सूचना दिल्या आहेत.