उमरगा शहरात दीपावली निमित्त रस्त्याशेजारील कुटुंबांना तसेच पालावरील कुटुंबांना शिधा किटचे वाटप .

दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव , प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधकार दूर करत तेजोमय करण्याचा हा दिवस. हे करत असताना आपल्या परिसरातील वंचित, कष्टकरी यांच्या आयुष्यामध्ये दिवाळीचा आनंद निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरातील रस्त्या शेजारील छोट्या व्यावसायिक कुटुंबांना तसेच शहरातील एकोंडी रोड भागातील पालावरील खोदकाम करणाऱ्या पालावरील कुटुंबांना साखर ,दाळी ,रवा, तांदूळ, तेल, साबण ,पेस्ट,चहापत्ती इत्यादी सह विवीध वस्तूंचे किट वाटप केले.