बुलढाणा जिल्ह्यात कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिलांच्या यादीत अग्रगण्य नाव म्हणजेच मा. ॲड. जयश्री सुनील शेळके. सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना त्यांनी सहकार, महिला सक्षमीकरण, बचतगट, कृषी, उद्योग, राजकारण या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना केली. दिशा अर्बन पतसंस्थेची स्थापना करून महिलांना आर्थिक भांडवल उपलब्ध करून दिले, तसेच अनेकांना रोजगार मिळवून दिला. कोरोना काळात त्यांनी धडाडीने मदतकार्य केले. `दिशा हेल्पलाईन`द्वारे अनेक रुग्णांना उपचार, औषधी, जेवण, अन्नधान्य किट या स्वरूपात मदत पुरवली.
ॲड. जयश्री सुनील शेळके यांनी नुकताच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. सध्या त्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिनिधित्व करीत आहेत. गतकाळात साखळी बु. जिल्हा परिषद सर्कल सदस्य पदावर असताना त्यांनी सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन नागरी विकासाचे अनेक प्रश्न सोडवले. उत्कृष्ट वक्त्या असलेल्या जयश्रीताई लोकप्रिय लोकनेत्या म्हणून ओळखल्या जातात. बुलढाण्यात विविध विकास कार्यातून त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. कर्तव्यनिष्ठ, बहुआयामी नेतृत्व म्हणून जयश्रीताई शेळके यांनी जनतेत अढळ स्थान निर्माण केले आहे.