सीना धरणातील पाणी नियोजन कर्जत तालुक्यातील २१ गावांसाठी हत्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचा प्रश्न

एकत्र येवून काम पुर्णत्वास घेवून जाणं म्हणजे काय हे कर्जत तालुक्यामध्ये आज अनुभवायला मिळत आहे. सीना धरणातील पाणी नियोजन कर्जत तालुक्यातील २१ गावांसाठी महत्वाचा पण तितकाच गुंतागुंतीचा प्रश्न झाला होता. त्याबाबत लोक, शासकिय अधिकारी व लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्यामार्फत एकत्रित समन्वय साधण्यात आला. पाण्याच्या नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस शासकिय अधिकाऱ्यांसोबत, शेतकरी, राष्ट्रवादी पक्ष व मित्रपक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. तात्काळ पाणी सोडले तर ते शेतकऱ्यांपर्यन्त न पोहचता नादुरूस्त असणाऱ्या पोटकालव्यामधूनच झिरपत राहील म्हणून पहिल्यांदा पोटकालवे दुरूस्त करण्याचे नियोजन करण्यात आले.कितीही मोठ्ठे काम असो आपण मिळून करू या विचारातून शक्य त्यान