Various issues plaguing the Kukri project

कुकडी प्रकल्पाचे विविध विषय शासकिय अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून लोकांसोबत चर्चा करून मार्गी लावण्यात येत आहेत. पाण्याच्या नियोजनाबरोबरीनेच अस्तरिकरण व भूसंपादनाचा मोबादला देण्याची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. कुकडी प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी एक शेतकरी गेली २० वर्ष झटत होते. लोकप्रतिनिधी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत म्हणून पाठपुरावा करण्यात आला व त्याचे फळ म्हणून पहिल्या टप्यात शासनामार्फत शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यात आले.